वरळिचा समुद्राकिणारा माझ्या अनेक सुख-दुखांचा साक्षिदार आहे. गावी गेलो कि धरण आणि मुंबईत आलो कि वरळि समुद्रावर मी फिरकतोच. या चौपाटिला नेहमीच चांगला विविध पातळिवर बहर येतो.इथला 'सनसेट' कित्येकांच्या मनाला भुरळ घालतो. राजमार्ग खेटून असल्याने इथला परिसर शांत नसला तरी समुद्रकाठी वसलेल्या बिल्डींग, चकाचक परिसर, गारवारा आणि समोरचे नयनरस्य दृष्य पाहुन प्रत्येक वाटसरू भारावून जातो! आर के लक्ष्मण यांचा आम आदमी सुद्धा या सर्वांची मजा घेत उभा आहे. एकदा मी माझे परममित्र सुहास खंडागळेसोबत गेलो असता त्याला म्हटले, 'आपल्यासारखे कित्येकजन शिक्षणासाठी, नोकरीसाठी, आरोग्यसेवेसाठी मुंबईला येतात तशा या एकामागुन एक येणा-यां लाटांना पाहुन मला वाटते!' किणा-यावर पोहचताच प्रत्येक पुढच्या लाटेवर मागची लाट वर्चस्व निर्माण करतेच हया सुहासच्या चलाख, अनपेक्षित आणि मार्मिक उत्तराने प्रत्येक क्षेत्रात चालणारे सिनिअर्स, ज्युनिअर्स असे गट पटकण डोळयासमोर आले! समुद्र म्हणजे माझा 'वीक पॉइंन्ट' माझ्यासारख्या रसिकाला समुद्राच्या पाण्याजवळ जाण्यापासुन रोखत...