सचिनच्या भारतरत्न वरून पुन्हा वाद सुरु ! बाबुराव खेडेकर :ठाणे १८ नोव्हे. २०१३ -विक्रमांचे डोंगर रचून आणि आदर्श राहणीमानामुळे करोडो क्रिकेटप्रेमी भारतीयांच्या मनावर अधिराज्य करणारया मराठमोळ्या सचिनला भारतरत्न मिळताच अनेकांच्या पोटात दुखू लागले आहे. खेळांसाठी भारतरत्नाचे प्रयोजनच नाही, सचिन आधी सुद्धा अनेक खेळाडू आहेत असे प्रश्न पुन्हा डोके वर काढताना दिसत आहेत.भाजपच्या कांही ज्येष्ट नेते मंडळीनाही वाजपेयींचे नाव भारतरत्न साठी सुचवायला हेच निमित्त मिळाले असावे ! मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला 'भारतरत्न' देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाचे खासदार शिवानंद तिवारी यांनी कडाडून विरोध दर्शवला आहे. 'सचिन तेंडुलकरला 'भारतरत्न' देण्याचा निर्णय अत्यंत हास्यास्पद आहे. कोट्यवधी रुपये कमावणाऱ्याला 'भारतरत्न' देण्याचे औचित्य काय,' असा सवाल तिवारी यांनी केलाय. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. सचिनला 'भारतरत्न' पुरस्कार घोषित झाल्याबद्दल देशभरात आनंद व्यक्त होत असतानाच शिवानंद तिवारी यांनी जाह ीर वक...