
Posts
Showing posts from 2013
विज्ञानाने प्रकाशमान व्हा !
- Get link
- X
- Other Apps
फिलीपाईन्स देशाच्या अदिवासी पाड्यात जिथे विज पोचत नाही तिथेले लोक पाण्याचे दिवे वापरतात. कसे? (हे तुम्ही घरी पण करु शकता आणि आसपासच्या पाड्यात विजेचा पर्याय म्हणुन पोचवु शकता) एक प्लास्टिकची बाटली घ्या त्यात ९०% पाणी भरा आणि त्यात ब्लिचिँग पावडर मिसळा. आता ही बाटली सुर्यप्रकाशात ५ तास घराच्या छतावर ठेवा जसा अंधार होईल तसा या पाण्याने शोषलेले सुर्यकिरणांचे परावर्तन होईल आणि ब्लबसारखा उजेड होईल आणि याचा उजेड ५५ वँट ब्लब एवढा असतो आणि हे पाणी किमान ८ ते १० तास निरंतर उजेड निर्मान करते. हे पाणी पुन्हा पुन्हा वापरता येते. taken by FB
बेस्ट चे स्मार्ट कार्ड महाग पडते !
- Get link
- X
- Other Apps
मोठा गवगवा करत बेस्ट प्रशासनाने सुट्ट्या पैशासाठी स्मार्ट कार्ड चा शोध लावला. सदर कार्ड चा वापर कमी होत असला तरी वाहक स्मार्ट कार्ड बद्धल आग्रही आहेत. कांही वाहकांना या स्मार्ट कार्ड वरून तिकीट देताना सवयीप्रमाणे वेगळा मार्ग अवलंबणे गैरसोयीचे वाटते. मुद्दा हा हि सदर स्मार्ट कार्ड घेताना २५ रुपये भरावे लागतात त्यानंतर १ आठवड्यानंतर हे स्मार्ट कार्ड मिळते. स्मार्ट कार्ड घेवून तुम्ही ४० रु. चा दैनिक पास काढू शकता शिवाय रिचार्ज केले तर तिकीट हि घेवू शकता मात्र स्मार्ट कार्ड रिचार्ज वर बेस्ट ५० रुपये स्मार्ट कार्ड मध्ये आगावू ठेवून घेते ते पैसे आपण वापरू शकत नाही. एका व्यक्तीचे ५० असे किती पैसे बेस्ट या मार्गाने जमा करणार ? महागाईमुळे वाढवलेल्या तिकिटांचा भार प्रवाशांच्या खिशाचा भार कमी करत आहे. त्यातच बेस्टने अशी ग्राहकांची लुट करणे योग्य नाही. हे असेच सुरु राहिले तर मुंबईकरांचा बेस्टच्या नवीन उपक्रमांना पाठींबा कसा मिळणार ? रेल्वे प्रशासनाने काढलेले स्मार्ट कार्ड ५ % वाढीव रक्कम ग्राहकांना देवून स्मार्ट कार्ड वापर...
सचिनच्या भारतरत्न वरून पुन्हा वाद सुरु !
- Get link
- X
- Other Apps
सचिनच्या भारतरत्न वरून पुन्हा वाद सुरु ! बाबुराव खेडेकर :ठाणे १८ नोव्हे. २०१३ -विक्रमांचे डोंगर रचून आणि आदर्श राहणीमानामुळे करोडो क्रिकेटप्रेमी भारतीयांच्या मनावर अधिराज्य करणारया मराठमोळ्या सचिनला भारतरत्न मिळताच अनेकांच्या पोटात दुखू लागले आहे. खेळांसाठी भारतरत्नाचे प्रयोजनच नाही, सचिन आधी सुद्धा अनेक खेळाडू आहेत असे प्रश्न पुन्हा डोके वर काढताना दिसत आहेत.भाजपच्या कांही ज्येष्ट नेते मंडळीनाही वाजपेयींचे नाव भारतरत्न साठी सुचवायला हेच निमित्त मिळाले असावे ! मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला 'भारतरत्न' देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाचे खासदार शिवानंद तिवारी यांनी कडाडून विरोध दर्शवला आहे. 'सचिन तेंडुलकरला 'भारतरत्न' देण्याचा निर्णय अत्यंत हास्यास्पद आहे. कोट्यवधी रुपये कमावणाऱ्याला 'भारतरत्न' देण्याचे औचित्य काय,' असा सवाल तिवारी यांनी केलाय. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. सचिनला 'भारतरत्न' पुरस्कार घोषित झाल्याबद्दल देशभरात आनंद व्यक्त होत असतानाच शिवानंद तिवारी यांनी जाह ीर वक...
झुलपेवाडीला मिळाली नवी ओळख
- Get link
- X
- Other Apps
नवीन आव्हाने पेलण्यासाठी झुलपेवाडी सज्ज ! फक्त १५०० लोकसंख्या असणारया चिकोत्रा धरणामुळे कालपर्यंत ओलाखल्याजानारया झुलपेवाडीच्या शिरपेचात साने गुरुजी वाचनालाय या बिगर राजकीय संस्थेने आणखी एक मानाचा तुरा रोवलाय! १९ ९६ साली ज्ञान मनोरंजन आणि विकास हे ब्रीद उराशी बाळगून वाचनालयाची स्थापना झाली ग़ेलि १७ वर्षे वाचनालयाने अतिशय खडतर प्रवासातून विविध समाजउपयोगी उपक्रम तोट्यात जावून सुद्धा राबविणाऱ्या या वाचनालयास २०११ चा आदर्श ग्रंथालय पुरस्कार भेटला शिवाय ब वर्गात आजरा तालुक्यातील कांही वाचनालये आहेत त्यात संस्थेचे नाव आहे ! या रोपट्याचा आज वटवृक्ष झालाय. दोन मजलि सुसज्य इमारत आज गावात दिमाखात उभी असून तिचे उदघाटन नुकतेच महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांचा हस्ते झाले. नूतन इमारतीसाठी १६ लाख खर्च आला असून आजही वाचनालयाचे अध्यक्ष पावले गुरुजी यांच्यावर ६ लाख रुपयांचे कर्ज आहे. पाटील साहेबांनी २ लाख रुपयांचा निधी देण्याचे जाहीर केले असून एक आव्हान केले आहे कि, 'आपल्या मोफत स्पर्धापरीक्ष्...