सर्जनशील भारतीय युवक @ CREATIVE YOUNG INDIAN
मी स्वताला सर्जनशील समजनारा सुशिक्षित युवक ! पण शारीरिक आनी आर्थिक दुर्बलतेमुले भितरलेला,दिशाहीन स्वप्नात रमणारा. दरिद्र्यामुले किलसवान्या वाटत असनारया जीवनाचा अंत करावा असे वाटावे असा एकाकी संघर्ष कुठवर चालायचा कुणास ठावे ! पण स्पंदनांच्या विश्वत विश्वनिर्मितिकर्त्यावर विश्वास ठेवून नवरसांचा आनंद आपल्या कुवतिने घेण्याची संधि का चुकवा ? असो अशा कल्पनेच्या तीरावर हा जीवनप्रवास चाललाय ,कधीतरी आपल्या मेहनतिला,खरेपनाला,भावनेला,आनी शब्दांना न्याय मिळेल या भावनेवर. मी काही बाराव्या किंवा सोलाव्या शतकातील गोष्टी सांगणार नाही कारन त्यातून पाकल आत्मविश्वास आनी क्षणिक सुखापलिकडे काहीच साध्य हॉट नाही हे कटुसत्य वाटते. दोन वेळाच्या भाकरीची भूक असलेला समाज टी मिलावन्यासठी अटपिता चालवितो.ती ही वेळेवर मिळत नाही किंवा धनिकांकडून उपकारल्यागत मिळते. अशावेळी माज्या सारखाय्ने स्वभिमानाच्या गोष्टी करूँन काय अर्थ ? सुशिक्षितातला सृजनशील आत्मा केवळ बोलत राहतो हे नैसर्गिक आहे मात्र ब्रेड -बटरसाती अर्थीक हितासम्बंधांची मुसकी बांधली की तोही आवाजच नाहीसा होतो;मग काय सर्वकाही दुर्लक्ष्य करत सहन करायचे आनी आलेल...