महाराष्ट्राच्या नेत्यांचा परिचय
*श्री. देवेंद्र गंगाधरराव फडणवीस* जन्म : २२ जुलै, १९७० जन्म ठिकाण : नागपूर शिक्षण : एलएल.बी. (नागपूर विद्यापीठ तृतीय मेरिट), एम.बी.ए., डिप्लोमा इन प्रोजेक्ट मॅनेजमेंट, डी.एस.ई. बर्लिन, जर्मनी येथून उत्तीर्ण ज्ञात भाषा : मराठी, हिंदी व इंग्रजी. वैवाहिक माहिती : विवाहित, पत्नी श्रीमती अमृता. अपत्ये : एकूण १ (एक मुलगी). व्यवसाय : सामाजिक कार्य. पक्ष : भारतीय जनता पक्ष. मतदार संघ : ५२ - नागपूर (दक्षिण-पश्चिम), जिल्हा - नागपूर. इतर माहिती : कार्यकारी सदस्य, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी (युनायटेड नेशन्सद्वारा मान्यता प्राप्त संस्था): उपाध्यक्ष, दि सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी, नाशिक (भोसला मिलिटरी स्कूल), उपाध्यक्ष, राष्ट्रीय अपंग कल्याण संस्था, अध्यक्ष, स्व. आबाजी थत्ते अनुसंधान संस्थानचे नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट, नागपूर; अध्यक्ष, नागपूर जिल्हा बास्केट बॉल संघटना, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्य, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, विविध उपक्रमात सहभाग. १९८९ वॉर्ड अध्यक्ष, भारतीय जनता पक्ष, धरमपेठ वॉर्ड, नागपूर; १९९० प्रसिद्धी प्रमुख, भाजप, ना...