देवाभाऊंच्या वैद्यकीय कक्षाच्या मदतीचा वाढता आलेख
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयांतर्गत वैद्यकीय कक्षाच्या मदतीचा वाढता आलेख मुंबई, दि. 7 : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयांतर्गत मंत्रालयातील विशेष वैद्यकीय कक्षाने रुग्णसेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांना त्यांच्या अडचणीच्या काळात मोठी मदत केली आहे. आरोग्य सेवेचा वसा घेवून गोरगरीब – गरजू रुग्णांना दुर्धर आणि महागड्या शस्त्रक्रियांसाठी मदत करण्याचे काम हा वैद्यकीय कक्ष करीत आहे. अशा रूग्णांना उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून थेट अर्थसहाय्य केले जात आहे. वैद्यकीय कक्षाचा सातत्यपूर्ण कामगिरीमुळे आलेख उंचाविला असून अवघ्या 9 महिन्यात एकूण 13 कोटी 25 लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे. जानेवारी, 2024 पासून ते सप्टेंबर 2024 पर्यंत कक्षाच्या माध्यमातून 418 रुग्णांना मदत झाली आहे. ह्रदय रोग, कर्करोग, यकृत प्रत्यारोपण, मुत्रपिंड प्रत्यारोपण, बोनमॅरो ट्रान्सप्लांट, फुफ्फुसाचे आजार, अस्थिरोग अवयव पुनर्स्थापना शस्त्रक्रीया (Replacement Surgeries)...