सारथी शिष्यवृत्तीचा लाभ घ्या !
छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, पुणे ( SARTHI PUNE ) या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेद्वारे छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती सन 2023-24 या शैक्षणिक वर्षातील इयत्ता नववी दहावी व अकरावी च्या मराठा व कुणबी गटातील विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. सारथी शिष्यवृत्ती काय आहे? कुणासाठी आहे? पात्रता काय आहे? कागदपत्रे कोणती आवश्यक आहेत? अर्ज कसा व कुठे करावा लागेल? या विषयी संपूर्ण माहिती आपण आज या लेखात पाहणार आहोत. छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्तीसाठी इयत्ता ९ वी, इयत्ता १० वी व इयत्ता ११ वी च्या मराठा, कुणबी, कुणबी- मराठा व मराठा- कुणबी या लक्षित गटातील विद्यार्थ्यांकडून अर्ज भरून घेऊन सादर करणे बाबत परिपत्रक व मार्गदर्शक सूचना छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था पुणे यांचे कडून मागविण्यात येतात. SARTHI PUNE संस्थे कडून वरील मराठा कुणबी गटातील इयत्ता नववी ते अकरावी तील पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षात प्रतिमहा 800 रुपये प्रमाणे वर्षाला एकूण 9600 रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. इयत्ता ९ वी, १० वी व ...