ती’लाही हवीय समान वागणूक...
देहविक्री करणाऱ्या महिलांच्या समस्या बाबत विचार करण्यासाठी नुकतीच मुंबईत एक परिषद झाली. या परिषदेत या महिलांच्या समस्याबाबत विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली. या परिषदेचा आढावा घेणारा लेख... “पतीच्या निधनानंतर दिराने एक लाखाला विकले….मुले पदरात आहेत. वय वाढल्याने आता अर्थार्जनही कमी आहे…म्हातारपणी कसे जगावे कुणाचाच आधार नाही…” ही वेदनादायक कथा ती महिला हूंदके देत सांगत होती. एकीने “सरकारी रूग्णालयातही योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर ओळखपत्र आणा असे सांगतात…” असे सांगितले. तर, “….बच्चो को पढाना है लेकीन आधार कार्ड लेके आओ…पिता का नाम क्या है..?” असे विचारत असल्याचे तीची सखी सांगत होती. बाजूच्या महिला त्यांना आधार देत होत्या. देह विक्री व्यवसायात असलेल्या या महिलाचं एकमेकींचा आधार असतात. मुलांचे ओळखपत्र तयार करताना आईचे नाव लिहू शकतो... याबद्दल त्यांनाच काय, अनेक संस्थांमधील नोकरवर्गाला माहित नसल्याने त्यांच्याकडून वडीलांचे नाव, दाखला अशी कागदपत्रे मागवली जातात. ती सादर न केल्यास त्यांना शाळेत प्रवेश मिळत नाही. पुरूष प्रधान संस्कृती बदलत असली तरीही, आई सुद्धा मु...