कल्याणमध्ये नवतेजस्विनी ग्रामोत्सव सप्ताह
नागरिकांना सहभागी होण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून आवाहन ठाणे :- आज राज्यातच नव्हे तर देशभरात महिला बचत गटाचा बोलबाला होत आहे. या बचत गटांच्या माध्यमातून सामान्य कुटुंबांतील महिला भगिनी सक्षम होत असून स्वतःच्या पायावर उभे राहत आहे. बचत गटाच्या विविध उत्पादनातून आर्थिक घडामोडीला चालना मिळत आहे. राज्यातही महिला बचत गटाची चळवळ मोठ्या प्रमाणात वाढत आहे. महिला आर्थिक विकास महामंडळ म्हणजेच माविमच्या माध्यमातून बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून ठाणे जिल्ह्यातील कल्याणमध्ये दि. 29 मार्च ते 2 एप्रिल 2023 दरम्यान बचत गटांच्या वस्तूचे प्रदर्शन व विक्रीचे नवतेजस्विनी ठाणे ग्रामोत्सव साजरा होणार आहे. या ग्रामोत्सवाच्या निमित्ताने महिला आर्थिक विकास महामंडळ व बचत गटांच्या कार्याचा घेतलेला थोडक्यात आढावा.... महिला आर्थिक विकास महामंडळ ( मा विम ) हा महाराष्ट्र शासनाचा अं गीकृत उपक्रम आहे . आंतराष्ट्रीय महिला वर्षाच्या निमित्ताने...