लाईटहाऊस तर्फे कल्याण डोंबिवलीतील सामाजिक संस्थांचा मेळावा संपन्न
डोंबिवली:- कल्याण डोंबिवली महानगरपालिका व लाईटहाऊस कम्युनिटीज फाउंडेशन आयोजित "सामाजिक संस्थांचा मेळावा" दिनांक २५ ऑक्टोबर २०२३ रोजी डोंबिवली लाईटहाऊस या ठिकाणी पार पडला. या मेळाव्यामध्ये कल्याण डोंबिवली प्रभागातील ३७ सामाजिक संस्थांनी सहभाग दर्शवला असून कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक मा. श्री. चंद्रकांत जगताप, सहाय्यक आयुक्त, कल्याण डोंबिवली महानगरपालिका (फ वॉर्ड) व डॉ.अरुण पाटील एम. एस. संजीवनी हॉस्पिटल, मा. जयश्री कर्वे, डोंबिवली महिला महासंघ हे होते. सर्व सामाजिक संस्थांनी "युवक व युवकांच्या बदलत्या करिअर विषयी अपेक्षा" यावर चर्चा करण्यात केली. या सर्व सामाजिक संस्था विविध विषयावर जसे रोजगार, आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण, बाल संरक्षण अशा विविध विषयांवर कल्याण डोंबिवली विभागात काम करत आहेत. सर्व सामाजिक संस्थांनी आपापल्या कामाबद्दल इतर सामाजिक संस्थांना माहिती दिली जेणेकरून ह्या सर्व संस्था एकत्रितपणे समाज विकासाचे काम करू शकतात. कार्यक्रमादरम्यान झोपडपट्ट्यांमधील युवकांसाठी सामाजिक संस्थेने कसे एकत्र येऊन काम करावे याबद्दल मार्गदर्शन मा...