विशाखापट्टणम येथे आदिवासी महोत्सव संपन्न

अराकू व्हॅली:- सनड्रीम्स डिजि. प्रा. लि.चे अध्यक्ष प्रताप नायडू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदिवासी समाजाला दिलेला उदात्तीकरण पाहून प्रेरणा घेत स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवाचा एक भाग म्हणून विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश येथे राष्ट्रीय आदिवासी महोत्सवाचे आयोजन केले. या महोत्सवात पुद्दुचेरी राज्य गृहमंत्री नमशिवयम, रेणुका सिंग,बीजेपी राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ एम चुबा आओ आदी मान्यवर उपस्थित होते. नमशिवयम यांनी आपल्या संबोधनात मोदीजीनी अशा लोकांना संधी दिली ज्यांनी देशाची प्रामाणिकपणे सेवा केली असे सांगताना द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती निवडले, ज्यांनी कधीच विचार केला नव्हता असा दाखला दिला. त्यांच्या नेतृत्वाखाली पाँडेचेरीच्या जनतेला विकासासाठी चांगल्या योजना मिळत आहेत असेही ते म्हणाले. या महोत्सवात रेणुका सिंह यांनी संबोधित करताना पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली सरकार १.१५ लाख आदिवासी गावांच्या उन्नतीसाठी काम करत असल्याचा उल्लेख केला. आदिवासी म्हणून आपण आपल्या आदिवासी संस्कृतीचे रक्षण केले पाहिजे. देशभरातील १९७ आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ भगवान बिरसा...