पनवेलमध्ये उद्या भाजपची प्रदेश कार्यकारिणी बैठक

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह ८०० प्रतिनिधींची उपस्थिती पनवेल : भारतीय जनता पार्टीची प्रदेश कार्यकारिणी बैठक शनिवार दिनांक २३ जुलै रोजी पनवेल मधील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणार असून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार्या या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार असल्याची माहिती भाजपचे महाराष्ट्र प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आज (दि. २२ जुलै) येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली. पनवेल शहरातील मार्केट यार्ड मधील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या पत्रकार परिषदेस कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, उत्तर रायगड जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, युवा नेते विनोद साबळे, महिला मोर्चाच्या जिल्हाध्...