योगदिनी उत्थानयोग ! सत्यमेव जयते फाउंडेशनचा उपक्रम...

*उत्थान योग आणि सत्यमेव जयते फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने योगदिन साजरा* (अंबरनाथ) येथील उत्थान योग आणि सत्यमेव जयते फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आठवा जागतिक योग दिन नुकताच मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सदर योग शिबिराला जमलेल्या साधकांनी योग प्रात्येक्षिकासहित सिंगिंग बाऊल ध्यान पद्धतीचा देखील अनुभव घेतला. योग एक असं शास्त्र आहे जे शारीरिक, मानसिक,आध्यात्मिक,सामाजिक ह्या सर्व स्तरावर अगदी प्रभावी काम करते. समाजातील सर्व वयोगटातील लोकांनी दिवसातील ठराविक वेळ राखून ठेऊन नियमित योगाभ्यास केला पाहिजे. त्यामुळे सर्व साधकांच्याकडून योगशिक्षक अविनाश सर यांनी योग प्रात्यक्षिके करून घेतली व योगाचे फायदे सर्वांना समजावून सांगितले. तर योगशिक्षक जितेंद्र सरांनी सिंगिंग बाउल ध्यान पध्दती करून घेतली. उपस्थित सर्व साधकांनी मिळालेल्या योग माहिती बद्दल समाधान व्यक्त केले. त्यांनी उत्थान योग व सत्यमेव जयते फाऊंडेशनचे आभार व्यक्त केले. सदर कार्यक्रमाला सत्यमेव जयते फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप मेंगाणे, संस्थापक सुनील बोरनाक, संत ...