शुद्ध हवेचे ध्येय गाठणे ही सामूहिक जबाबदारी : आ. प्रशांत ठाकूर

पनवेलच्या शुद्ध हवेसाठी स्थानिक नागरिक व सर्व पक्ष एकवटले ! पनवेल: शुद्ध हवेचे धेय्य गाठणे हि स्थानिक नागरिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणा यांची सामुहिक जबाबदारी आहे. वायू प्रदूषण हा विषय आपल्या सर्वांच्या जीवनासाठी अत्यावश्यक आहे. भावी पिढ्यांच्या सुरक्षित आरोग्यासाठी स्वच्छ हवा गरजेची आहे. पनवेलमधील वाढत्या वायू प्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी स्थानिक नागरिक, लोक प्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणांनी सामुहिकरीत्या प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत आमदार प्रशांत ठाकूर यांनी नुकतेच मांडले. हवेची गुणवत्ता सुधारणे हि केवळ प्रशासनाची किंवा कोण्या एखाद्या संस्थेची किंवा एखाद्या व्यक्तीची जबाबदारी नसून त्यासाठी सर्वांनी एकत्र या असे आवाहनही त्यांनी केले. क्लीन एअर फॉर पनवेल या परिसंवादात ते बोलत होते. पनवेल परीसरातील हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस खालावत असल्यामुळे पनवेलकरांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पनवेल आणि लगतच्या परिसरातील हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधी यांच्यावतीने धोरणात्मक उपायांवर चर...