राज्यपाल भगतसिंग कोश्यारी रविवारी विरार - अर्नाळ्यात!

· ' नूतन गुळगुळे फाउंडेशन ' निर्मित दिव्यांग मुलांच्या वसतिगृहाच्या भूमिपूजनासाठी राज्यपाल अर्नाळ्यात! · कोविड-१९ मध्ये पालक गमावलेल्या ‘ दिव्यांग मुल आणि त्याचे एकल पालक यांच्याकरिता वसतिगृहाची ’ निर्मिती! · १७ वर्षाखालील संपूर्ण महाराष्ट्रातील खेड्यापाड्यातल्या ' दिव्यांग मुलांना संपूर्ण आयुष्यभर निवास - उपचाराची व्यवस्था! · स्वावलंबन प्रशिक्षणासाठी विशेष केंद्राचीही निर्मिती कोरोनामुळे पालक गमावलेल्या ‘ दिव्यांग ’ बालकांकरिता विरार , अर्नाळा येथे वसतिगृह आणि प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार असून येत्या ३ एप्रिल २०२२ रोजी , सकाळी ११:२२ वाजता, श्री स्वामी कृपा , प्रभात कॉलनी, अर्नाळा, विरार येथे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल महामहीम भगतसिंग कोश्यारी यांच्या शुभ हस्ते ‘स्वानंद सेवा सदन’ ...