शिवसेना नेते आझाद मैदानात संभाजीराजेंच्या भेटीला

आरक्षणाच्या निर्णायक लढाईसाठी मराठा तरुण आक्रमक मुंबई : मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न न्यायाल्यात प्रलंबीत असल्याने मराठा समाजाच्या प्रमुख मागण्यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत. शनिवारपासून उपोषणाला सुरुवात झाली आहे. मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषणावरून हटणार नाही, असा पवित्रा संभाजी राजेंनी घेतला आहे. त्यामुळे आज त्यांना भेट देण्यासाठी शिवसेनेचे प्रमुख नेते आले होते. यावेळी मराठा तरुणांच्या रोषाला सर्वांना सामोरे जावे लागले. उपोषणासाठी बसलेल्या खासदार संभाजी राजेंची भेट घेण्यासाठी शिवसेनेचे नेते आझाद मैदानात आले होते. सुरपातीस खासदार राहूल शेवाळे यांनी येवून संभाजीराजेंची चौकशी केली. तर त्यानंतर शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई, महापौर किशोरी पेडणेकर आणि खासदार अरविंद सावंत हे आझाद मैदानावर आले. यावेळी आझाद मैदानात बसलेल्या तरुणांनी जोरदार घोषणाबाजी केली. अखेर संभाजी राजेंनी स्वतः उभं राहून कार्यकर्त्यांना शांत केलं. ''माझ्यासमोर असा उद्रेक होणे बरोबर नाही. तुमचा राजा जिवंत पाहिजे असेल तर हे योग्य न...