कल्याण सकल मराठा महासंघची स्वच्छता मोहीम

कल्याण (पु) ला लोकग्राम तिकिट खिडकीच्या बाजुला *छत्रपती शिवाजी महाराजांचे* स्मारक आहे. त्या स्मारकाभोवतालचा परिसर कुणीही लक्ष न दिल्यामुळे दुर्गंधीत झाला होता. भाजीवाल्यांनी टाकलेला केरकचरा, वाढलेले गवत, झालेला चिखल यामुळे स्मारक दिसेनासे झाले होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली रयत(जनता) सुखी समाधानी रहावी यासाठी स्वराज्याची स्थापना केली, अश्या या आपल्या शुरू पराक्रमी राजाच्या पवित्र स्मारक च्या आसपास चा परिसर खाण असताना देखील कुणीही पुढाकार न घेतल्यामुळे गेली कित्येक वर्ष तसाच होता.... हे सकल मराठा महासंघ चे संस्थापक अध्यक्ष श्री अमर वाघ साहेब यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने सकल मराठा महासंघ चे कल्याण जिल्हा व तालुका अध्यक्ष श्री. विनायक भालेराव व श्री. अनिल कोकाटे यांना स्वच्छता मोहीमेची कल्पना दिली. मग सदर जागेची पाहणी करून श्री. विनायक भालेराव साहेबांनी व अनिल कोकाटे साहेबांनी तेथे आज दिनांक २४/१०/२०२१ रोजी सकाळी ११ वाजता. स्वच्छता मोहीम राबवली. या मोहिमेत अनेक शिवप्रेमीनी सहभाग घेवून सदर परिसर स्वच्छ करून घेतला व पर...