आता डोंबिवलीतही पासपोर्ट सेवा केंद्र !
· डोंबिवली एम . आय . डी . सी . येथील पोस्ट ऑफिसमध्ये पासपोर्ट सेवा केंद्र सुरू होण्यास ऑक्टोबर महिन्यातील दुसऱ्या आठवड्याचा मुहूर्त... · परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि टपाल खात्यांचा डोंबिवली पासपोर्ट सेवा केंद्रास हिरवा कंदील... · खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांना यश डोंबिवली , २० सप्टेंबर: कल्याण लोकसभेचे प्रतिनिधित्व करणारे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सन २०१७ पासूनच्या पाठपुरव्यानंतर डोंबिवली एम.आय.डी.सी. येथे पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र सुरु करण्यासाठी मंजुरी मिळाली व लवकरात लवकर हे केंद्र सुरू व्हावे , यासाठी खासदार डॉ. शिंदे नेहमीच तत्पर होते. परंतु जागेअभावी सदर पासपोर्ट सेवा केंद्रास विलंब होत होता , त्यानंतर डोंबिवली एम.आय.डी.सी येथील पोस्ट ऑफिसची निवड करण्यात आली. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सतत पाठपुरावा के...