भारतात पैसा गुंतवला ही चूक ? :- केतन कक्कड
अनिवासी भारतीय केतन कक्कड यांनी अमेरिकन न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीचा गोषवारा मुंबई : (बाबुराव खेडेकर) अमेरिकेत 28 वर्षे व्यवसाय करून बेस्ट इंडियन ज्वेलर्सचा सन्मान मिळविलेले केतन कक्कड सध्या गेली 7 वर्षांपासून मायदेशी परतले आहेत. मात्र त्यांच्या उतारवयात हॅपी इंडिंग न होता पनवेल मधील वृंदावन फार्म या हॉर्टिकल्चर सोसायटीमध्ये जमीन खरेदीसाठी गुंतवलेली आयुष्यभराची जमापुंजी सलमान खानच्या भाईगिरीमुळे अडचणीत आली आहे; त्यामुळे प्रशासन, न्यायालय आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडे ते दाद मागता आहेत मात्र देशातील बाबूशाही आणि भ्रष्टाचार याला कंटाळून त्यांनी उद्विग्न होत भारतात पैसा गुंतवला ही चूक झाली का ? असा प्रश्न अमेरिकन न्यूज पोर्टल वरून कपूर शोमध्ये उपस्थित केला आहे. सदर पोर्टलवर लाखो अनिवासी भारतीय असून हजारो एनआरआयची प्रत्यक्ष शोमध्ये उपस्थिती होती. सध्या सोशल मीडियावर हा शो व्हायरल होत आहे. सदर मुलाखतीत कक्कड यांनी अनिवासी भारतीयांना एकत्र येन्याचे आवाहन केले आहे. जवळपास 2 करोड अनिवासी भारतीयांचे प्रतिनीधीत्व सत्तेत नसल्याने त्यांना क...