भारतीय ख्रिश्चन मंचद्वारे राममंदिरासाठी निधी संकलन.

नवी दिल्ली:- माननीय इंद्रेश कुमार जी यांच्या नेतृत्वाखाली श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्रासाठी भारतीय ख्रिश्चन मंच याद्वारे निधी संकलन 25 मार्च 2021 रोजी करण्यात आले. हिंदू बांधवांप्रती बंधुत्वाची भावना जागृत करत संपूर्ण देशभरातून भारतीय ख्रिश्चन मंचाने लाखो रुपयांचा निधी श्री राम जन्मभूमि साठी दिला आहे. एकत्रित निधीचे समर्पण कार्यक्रम वेळी अखिल भारतीय संत समिती आणि गंगामहा समितीचे महासचिव श्री. स्वामी जितेंद्रनंदा सरस्वतीजी, भाजप केंद्रीय संपर्कप्रमुख श्री बलराजजी नुणे, भारतीय ख्रिश्चन मंच अध्यक्ष श्री वडकंनजी टॉम, भाजप राष्ट्रीय प्रवक्ते आणि भारतीय ख्रिश्चन मंच कन्व्हेनर श्री.पल्ला प्रताप नायडू,एस के मॉल, जय मॉल, श्रीमती सुवर्ण चला जी, डॉ. अजय आबेल आदी मान्यवरांसह शेकडो कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.