उल्हास नदीतील जलपर्णीच्या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढणार :- ना. शिंदे यांची ग्वाही

उल्हास नदीतील जलपर्णीच्या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढणार पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही ठाणे दि. 27- ठाणे जिल्ह्यातील बव्हंशी नागरी भागांना पाणीपुरवठा करणाऱ्या उल्हास नदीत दरवर्षी उद्भवणाऱ्या जलपर्णीच्या समस्येवर जैव तंत्रज्ञानाच्या साह्याने कायमस्वरुपी तोडगा काढण्यात येत असल्याची ग्वाही ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. सध्या अस्तित्वात असलेल्या जलपर्णी जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने नष्ट करून, नदीचे पाणी शुद्ध करून पुन्हा जलपर्णी निर्माण होऊ नयेत, यासाठी पावले उचलण्यात येत असल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले. मी कल्याणकर सामाजिक संस्थेचे नितीन निकम, कैलास शिंदे आणि उमेश बोरगावकर आंबिवली नजीक उल्हास नदीजवळ आंदोलनाला बसले होते. श्री. शिंदे यांनी शनिवारी त्यांची भेट घेतली. याप्रसंगी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, उल्हासनगर महापालिका आयुक्त ए. एन. राजा, जिल्हा परिषद सीईओ, तसेच सगुणा बागेचे प्रगतिशील शेतकरी व मायक्रोबायॉलॉजिस्ट शेखर भडसावळे, आमदार विश्वनाथ भोईर, शांतार...