योगशिक्षक अविनाश लोंढे यांचा योगप्रवास

"योग : दहा वर्षाचा प्रवास" वर्ष २०१०.त्यावेळी मुंबईच्या बांद्रा येथे एका खाजगी कार्यालयामध्ये मी काम करत होतो .मला ऑफिस टू ऑफिस कामानिमित्त दादर ला जावे लागत असे. त्यावेळी चार-सहा महिन्यातुन केव्हातरी एकदा कंबरेत दुखू लागायचं. मग २००४ साली दहावीला असताना श्री मुळीक सरांनी आमचे दररोज शाळेत योग वर्ग घेतले होते ते आठवलं. आणि दादर हे खेळांचे माहेरघर .म्हणून आमच्या दादर च्या ऑफिस मधल्या मित्राला विचारले. दादर मध्ये योग वर्ग कुठे चालतात..? तो म्हणाला..शिवाजी पार्कात.. स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात. माझी ड्युटी सकाळी सहा ते दुपारी दोन पर्यंत असे. त्या वेळी मी डिलाइल रोडला राहत असे. त्या दिवशी कामावरून घरी न जाता मी थेट वीर सावरकर स्मारकात चौकशीला गेलो. सुरक्षा रक्षकांकडे चौकशी केली. ते म्हणाले थोड्या वेळाने मॅडम येतीलच तुम्ही त्यांना भेटू शकता. मग बाहेरच गणपती मंदिर आहे. त्या कठड्यावर बसून राहिलो. पाचच्या सुमारास मॅडम आल्या. त्या जवळच राहत होत्या. त्यावेळी त्यांना वाटलं सुद्धा नसेल...