आठवणीतील नागपंचमी :- संदीप मेंगाने
प्रसिद्ध कवी, लेखक, पटकथाकार मा. संदीप मेंगाणे यांच्या आयुष्याच्या आठवणींच्या सरोवरातील एका अमृतमयी आठवणींचा सारांश... *आठवणीतील नागपंचमी** आषाढ संपला की श्रावणातल्या चैतन्यमयी उत्साहाने निसर्ग अगदी फुलून जातो.शिवार हिरवाईनं खुलून जातं. आणि असंख्य सोहळ्यांची पर्वणी घेऊनच जणू श्रावणाची सुरुवात होते. आणि मग एकापाठोपाठ एक अशा उत्सवाची जणू रांगच लागते. त्यातला पहिलाच सण म्हणजे नागपंचमी. हा सण खास करून महिलांना खुप आवडतो.आमच्या घरी नागपंचमी च्या अगोदर पासूनच माहेरवाशीण पोरींची सोबत जुन्या जाणत्या महिलांची फेर धरून टाळ्यांच्या ठेक्यात नागोबाची, आणि येणाऱ्या पुढील सणांची गाणी रोज मध्यरात्री पर्यंत चालायची. माझ्या घरी मातीपासून बनवलेल्या पंचमुखी नागाची पूजा केली जाते. येणाऱ्या नागाची तयारी माहेरवासिनी आधीच महिनाभरापासून करायच्या. आमच्या घरात तर संपूर्ण गावच खेळायला असायचा. हा सण म्हणजे आमच्यासाठी जणू दिवाळीदसराच. प्रत्येक घरात नागाची मूर्तीपूजा केली जाते .पण माझ्या घरी मातीपासून अडीच - तीन फुटी उंच मूर्ती बनवली जाते. मूर्त...