कोल्ही कोपर गावचा शेवटचा एक गाव एक गणपती

पनवेल:- बाबुराव खेडेकर पनवेल तालुक्यातील कोल्ही कोपर गाव येथील स्वयंभू गणपतीमुळे नावारूपास आलेले आहे .या गावात घराघरात गणपती बसत नसून गावाचे ग्रामदैवत असलेल्या चिंतामणीची सेवा हाच उत्सव येथे जल्लोषात साजरा केला जातो. गावातील एकोपा व परोपकारी वृत्ती वाढीसाठी गणेशोत्सव महत्वाची भूमिका पार पाडत आहे. हे गाव नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे विस्थापित होत असून कोल्ही कोपर गावचा हा शेवटचा एक गाव एक गणपती असेल असे भाविक सांगत आहेत. असे असले तरी जेथे जाऊ तेथे चिंतामणीची सेवा करू असा निर्धारही गावातील कांही बुजुर्ग नागरिकांनी व्यक्त केला आहे. कोकण आणि गणेशोत्सव हे नाते अतूट आहे. घरातील गणेशमूर्ती सामाजिक एकोप्यासाठी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सार्वजनिक उत्सव बनवून पूजन सुरु केले. त्यातूनच गणेश मंडळांचे पेव फुटले.मंडळांमध्ये स्पर्धा वाढली त्यामुळे गावात गटातटात कटुता निर्माण व्हायला लागली. त्यामुळेच सुजाण नागरिकांनी एक गाव एक गणपती हि संकल्पना राब...