*मीडियावर सामान्य माणसाचा बहिष्कार*

*मीडियावर सामान्य माणसाचा बहिष्कार* कारण.... सामान्य माणसाला भेडसावणारी प्रचंड महागाई हे दाखवत नाहीत... रोज लोकल ट्रेनच्या अपघातात मरणाऱ्या सामान्य माणसाच्या व्यथा हे दाखवत नाहीत... सरकारच्या चुकीच्या धोरणाचा नागरिकांना बसलेला फटका हे दाखवत नाहीत.... पण ....निवडणूक व्हायच्या आधी सत्ता कुणाची येणार...हे एक महिना आधी सर्व्हे करून यांना माहित पडत...जनता खुश कि नाखूष हे यांना सर्व्हे करून कळत.... अरे मग सामान्य माणूस महागाईने बेजार झाला आहे हे सर्व्ह करून कळत नाही का? नागरिकांना विनंती आहे की अशा चॅनल पासून सावधान,मी कोणत्याही पक्षाचा नाही मात्र अशा पद्धतीने मीडिया काम करायला लागला तर आपल्या डोक्यात खोट्या गोष्टी पेरल्या जातील,एका दिवसात लालू मुले नितीश ने राजीनामा दिल्याचा यांचा सर्व्हे कसा झाला?सर्व्ह करणारे शहाणे आणि देशातील जनता मूर्ख आहे असे यांना म्हणायचे आहे का?लोकांची मने सर्व्हे च्या माध्यमातून तयार केली जात आहेत.जे बड्या लोकांना हवं आहे तेच आपल्यावर लादलं जात आहे...हे फार भयानक आहे.आपल्याला ते दाखवलं जात आहे जे मुळात अस्तित्वात नाही.आपण आभासी आणि कल्पनेतील...