भाजपचा एकात्म मानवतावाद
हिंदुस्थानातल्या गुलामगिरीला कांही अंतच नाही. काळे गोऱ्यांचे गुलाम आहेत, स्त्रिया पुरुषांच्या गुलाम आहेत, अस्पृश्य स्पृश्यांचे गुलाम आहेत,खेडी शहरांची गुलाम आहेत,जनावरं माणसांची गुलाम आहेत.... हि यादी हवी तितकी वाढवता येईल असे सेवाव्रती विनोबा भावे यांनी म्हटले आहे.या परिस्थितीचा परामर्श घेण्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी भारतात जिथे धर्माला समृद्धी,कल्याण आणि मोक्ष मानले जाते तोच धर्म म्हणजे व्यक्ती,समाज,सृष्टी आणि परमेश्वर यांच्या एकात्मतेचा विचार मांडला. भारतीय जनता पार्टीने एकात्म मानवतावाद हा एतद्देशीय विचार पक्षाचे तत्वज्ञान म्हणून स्वीकारले आहे. एकात्मता संपूर्णतेत समाविष्ट असते. संपूर्णतेच्या अभावात मनुष्य अपूर्ण दृष्टीच्या प्रभावाखाली जातो. जशी ब्रह्मांडात संपूर्णता असते तशीच ती व्यक्तीतही असते. व्यक्ती म्हणजे केवळ शरीर न्हवे तर त्याच्याजवळ मन ,बुद्धी आणि आत्माही आहे याचा विचार आहे. या चारपैकी एकाकडे जरी दुर्लक्ष केले तरी मनुष्य विकलांग होईल अशी धारणा एकात्म मानवतावादाची आहे. वेगव...