मानव सेवाव्रती विनोबा भावे यांचे विध्यार्थी गुणविकास विचार
१)विनाकारण कसलेही भय बाळगू नये !भय वाटल्यास देवाचे नाव घ्या कारण देव नामापुढे भयाचा टिकाव लागत नाही. २)जमेल तेव्हा जमेल तितकी आणि जमेल त्या लोकांना मदत करावी. ३)दररोज आपल्या हातून घडलेल्या चुकांचा धांडोळा घेऊन त्या सुधारण्याचा प्रयत्न करावा. जुन्या चुका पुन्हा नव्याने कधीच करू नये. ४)प्रत्येक ठिकाणी पुढे पुढे करू नये. ५)मारामाऱ्या,भांडणे करू नयेत.कुणाचे मनसुद्धा दुखवू नये. ६)श्रम आणि उत्पादन केल्याविना भोजन करू नये. ७)गुरूजनांची शक्य तितकी सेवा करावी. ८)सरळ बसा,सरळ बोला आणि सरळ विचार करा. ९)रोज नियमितपणे कांहीतरी अभ्यास करीत जावा. १०)रागावू नये. राग हा दुर्बलतेची लक्षण आहे. ११)विनम्रपणे वागण्यातच खरा मोठेपणा आहे. १२)स्वच्छता,नीटनेटकेपणा या गुणांमुळे आपलं व्यक्तिंमत्व उत्तम घडतं. १३)उर्मटपणे वागू नये.सर्वांमध्ये मिळून मिसळून वागावे. मर्यादाशील असावं. १४)शक्तीच्या जोरावर कुणी आपल्यावर दबाव आणत असेल तर मुळीच दबून जाऊ नये. १५)सत्याला धरून राहावं. नेहमी खरे बोलावे....