पनवेल महापालिकेची तिजोरी भरणार !

पनवेल महापालिकेचा शिलकीचा अर्थसंकल्प आरंभीची शिल्लक ९८ कोटी ४२ लाख ९३ हजार ४७६ सण २०१७-१८ मधील अपेक्षित जमा :- १२१२ कोटी ८२ लाख ८३ हजार ४७६ अपेक्षित खर्च : - १०३५ कोटी ७७ लाख ६१ हजार अखेरची शिल्लक :- १७७ कोटी ५ लाख २२ हजार ४७६ पनवेल :- बाबुराव खेडेकर पनवेल महानगरपालिकेचा पहिला अर्थसंकल्प शुक्रवारी (दिनांक ३१ मार्च) आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी मांडला. नागरी सुविधांवर आणि महापालिका हद्दीतील वेगवेगळ्या भूभागाच्या नियोजनावर भर देणारा हा शिलकीचा असा हा अर्थसंकल्प आहे.आयुक्तांच्या अधिकारात नियोजन केलेल्या या अर्थसंकल्पात मालमत्ताकराबाबत तसेच पाणीपट्टीबाबत दरनिश्चितीचे को णतेही खात्रीशीर धोरण जाहीर केलेले नसून हा ढोबळ अर्थसंकल्प महापालिकेच्या पहिल्या महासभेसमोर सादर करून मंजुरी घेण्यात येईल असे आयुक्तांनी यावेळी सांगितले. रायगड जिल्ह्यतील पहिली महापालिका असलेल्या पनवेल महापालिकेचा पहिला अर्...