
Posts
Showing posts from January, 2017
ना नक्षलवाद ना मार्क्सवाद फक्त राष्ट्रवाद !
- Get link
- X
- Other Apps

'लेफ्ट राईट लेफ्ट'चा नाट्यप्रयोग पनवेलमध्ये यशस्वी.... उरी हल्ल्यातील शहिदांना अनोखी श्रद्धांजली पनवेल:-बाबुराव खेडेकर बहुप्रतीक्षित 'लेफ्ट राईट लेफ्ट' नाटकाचा प्रयोग पनवेलमध्ये निर्विघ्नपणे पार पडला. चर्चेची दारे सदैव उघड्या ठेवणाऱ्या रा स्व संघाच्या विचारधारेने प्रेरित झालेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पनवेल शाखेतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात डावी,उजवी विचारसरणी उलघडण्यात आली.या दोन्ही विचारसरणी भारताच्या असून आपल्या नागरिकांचा कशाप्रकारे बुद्धिभेद करतात व देशविघातक कृत्ये घडवून आणतात याचे आत्मपरीक्षण करायला लावणारा हा धाडसी नाट्यप्रयोग आहे.या आशयघन नाटकातुन तथाकथित बुद्धिवाद्यांवरही मार्मिक टिका करण्यात आली आहे. हुकूमशाहीपेक्षा लोकशाही कधीही उजवी असा आशावाद नाटकातून व्यक्त केला आहे.मतभेद असतील तर ते व्यक्त करण्यासाठी बंदुका नकोत कर लोकशाही मार्गानेच विरोध व्हायला हवा असा मार्ग नाटकातून दर्...