धीयो यो न: प्रचोदयात !

तिन्ही लोक दीप्तिमान करणाऱ्या सूर्यासारखी आमची बुद्धी तेजस्वी व्हावी ही आपली आद्य प्रार्थना आहे ! अंधारातून प्रकाशाकडे जाण्याची आशाच भारतीय संस्कृती आणि आध्यात्मामध्ये पदोपदी प्रतीत होते. ज्ञानाधिष्ठित समाज हे भारतीयांच्या सुप्त इच्छाशक्तीचे प्रतीक आहे. परलोकाचे वेध लागलेल्या भारतीय समाजाला 'ठेविले अनंते तैसेचि राहावे' हा विचार मान्य नसून आपल्या अधिभौतिक प्रगतीचे वेड लागले आहे. सम्रुद्र पार करून नवनवी यशोमंदिरे पार करणारे भारतीय खऱ्या अर्थाने 'हे विश्वची माझे घर' हा वैश्विक विचार खरा करत आहेत. बुद्धिनिष्ठ,विवेकनिष्ठ,तर्कनि ष्ठ,विज्ञाननिष्ठ असे शब्दप्रयोग हल्ली वारंवार वापरले जातात. आपली बुद्धी मिळविलेल्या माहितीवर कौशल्याच्या बळावर प्रयोग करून नवनवीन अनुभव घेत असते.अनुभवाचे आंतरिकरण झाल्यावर आपल्याला अनुभूती मिळत असते.याच अनुभूतीतून आपल्या बुद्धीला ज्ञानाचे दर्शन घडते.ज्ञानाच्या शहाणपनातून प्रतिभेच्या साथीने बुद्धी नवनवीन शोध लावते.मौलिक विचाराच्या शिडीवर चढून बुद्धी प्रज्ञावान होते.ह्या प्रज्ञेचे विद्युल्लतेसारखे चपळ रूप म्ह...