विकासयात्रेवर सैराट पनवेल !

बदलते पनवेल बहरते पनवेल मुंबईवरील वाढता नागरी ताण कमी करण्यासाठी नवीमुंबईची निर्मिती राज्यशासनाने केली. त्यामध्ये रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्याती ल बराचसा भाग शामिल असल्याने नागरीकरणाचे लोन पनवेलमध्ये झपाट्याने पसरले. राज्यातील पहिली नगरपालिका असलेल्या पनवेल नगरपालिकेला नागरी जीवन कांही नवीन नसले तरी कोकणातील शहरांना प्रामुख्याने भेडसावणाऱ्या पायुभूत सेवासुविधांच्या समस्या या शहराला भेडसावत होत्या. पनवेल म्हटले कि लोकनेते दि. बा. पाटील यांच्या मागोमाग लोकनेत्ते रामशेठ ठाकूर यांचे नाव घेतले जाते. स्थानिक भूमिपुत्रांनी अनेक वर्षे ठाकूर कुटुंबियांच्याकडे विश्वासाने पनवेलची सत्ता दिली आहे. मा. खा. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या बहुआयामी लोकसेवेचा वसा समर्थपणे पेलणारे दूरदर्शी नेतृत्व म्हणजे त्यांचे सुपुत्र आ. प्रशांत ठाकूर. त्यांच्याच दूरदृष्टीतून १ ऑक्टोबर २०१६ पासून पनवेल महानगरपालिका अस्तित्वात आली आहे.महापालिकेला आधी विरोध करणारे अचानक समर्...