सैराट झाल जी....
उत्कृष्ट कलाकृती पाहिली कि प्रतिक्रिया दिल्याशिवाय मन मोकळे होत नाही. मला वाटते प्रत्येकजन कधिकरी कशासाठीतरी सैराटलेला असतो मात्र जगरहाटीची वस्तुस्थिती लक्षात येइप्रयंत खुप उशिर झालेला असतो. महाराष्ट्र जातिबाह्य लग्न केले म्हनुन विवाहितास मारन्यामध्ये देशात खुप मागे आहे हे लक्षात घ्या... कदाचित म्हनुन तर एवढी कळकळ बर्याच दिवसांपासुन व्यक्त होत आहे. असो, स्त्रिप्रधान कलाकार असनारा मराठीतिल पहिला चित्रपट असावा ! वास्तविक दुख: विसरन्यावर परदेशात एक उपचार पद्धती आहे ति म्हनजे सॅड ड्रामा पहायचा मग आपले दुख: कमी होते. मात्र सैराटचा फॉर्म नविन आहे त्यात कॉमेडी आनि मेलोडि एकत्र आहे ! हॅपी एंडिंगच्या कल्पनेला छेद देत अंतर्मुख व्हायला लावनारा सैराट खरा संपत नाही तर सुरु होतो कारन रोजच्या धकाधकिच्या जीवनात परश्या व आर्ची सतत कुटुंब उद्धारासाठी एकाकि संघर्ष करत असतात सोबत पुर्वग्रह/अंधश्रद्धा/अद्न्यान आणि बरेचकाहि घेवुन..... शेवटी रडत बसेल तो मराठी मानुस कसला; उत्कट जगने हा स्थाइभाव ठेवुन वाजवा झिंग झिंग झिंगाट.... बाबुराव खेडेकर...