प्रासंगिक
संविधानावरील/कायद्याच्या राज्यावरील श्रद्धा अढळ ठेवा ! जे एन यु प्रकरण असेल किंवा रोहित वेमुलाचे उदात्तीकरण (आरक्षणवादी ?पटेल पण आठवा !) अभिव्यक्ती स्वातंत्र या मुद्यावरून नागरिक ज्या आतताई पद्धतीने वागत आहेत त्यामुळे समाजमन कसे आहे हे कळते. या समाजमनाला नियोजित वाटेवर घेवून जाण्यासाठी वेगवेगळ्या विचारधारा प्रभावीपणे काम करत असल्याचे दिसत आहे. नागरिकांचे एकवेळ ठीक आहे पण ज्यांनी समाज्याला मार्गदर्शन करायचे असा बुद्धिवादी वर्ग सुद्धा या विचारधारांचा बळी ठरावा हे दुर्दैव !राजधानी दिल्लीत नेहरू विद्यापीठातील काही वादांमुळे न्यायालयातील वकीलही कायदा हाती घेऊ लागले आहेत आणि त्यांनी देशद्रोही घोषणा देणार्यांना चोपण्यापर्यंत मजल मारली आहे.दिल्लीत कायदे विशारदांचा हा पवित्रा येऊ घातलेल्या धोक्याचा इशारा आहे. सामान्य माणूस कायद्याविषयी अनभिज्ञ असतो. पण कायद्याचा विद्यार्थी मानला जाणारा वकील, कायद्याचे पावित्र्य जपायला कटीबद्ध असतो. तीच गोष्ठ भारतीय पत्रकारितेची आहे. पत्रकारितेमध्येसुद्धा डावे उजवे असा भेद सरळ दिसू लागला आहे. सर्वांनी जनतेला गृहीतच...