भूमिका

ग्रामीण भागातील तरुण हुशार,सामर्थ्यशाली,मेहनती आणि प्रामाणिक असतो मात्र गरिबीमुळे तसेच संधी न मिळाल्यामुळे तो काम धंद्यासाठी शहरात विस्थापित होतो तेंव्हा एकाकी पडतो व घाबरतो… नेमके काय करावे याचे मार्गदर्शन न मिळाल्यामुळे वेळ आणि पैसा वाया घालवण्याचीही वेळ त्याच्यावर येते असा बहुतेकांचा अनुभव आहे. पुढे याच विद्यार्थ्यांची परिस्थिती 'ना घरका ना घाट का' अशीच होते ! खरी भारतीय संस्कृतीखेड्यात आहे असे महात्म्यांनी सांगून ठेवले आहे मात्र महाराष्ट्रात खेडी ओस पडत असल्याचे दिसत आहे. शहरातील नागरिकांना आपापल्या गावाचा शाश्वत विकास व्हावा व शहरातील सुखसोयी आणि संधी ग्रामीण भागात निर्माण व्हाव्यात असे वाटत असते. त्यानुसार यथाशक्ती आपल्या जडण-घडणीस कारणीभूत असणाऱ्या ग्रामीण भागातील शिक्षण संस्था,सामाजिक संस्था यांचे उतराई होण्याचा प्रत्येकजन प्रयत्न करत असतो. या विचारसरणीच्या लोकांचा हा समूह असून चांगल्या समाजासाठी आदर्श विध्यार्थी पुरस्काराच्या निमित्याने सुरु झालेली कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा-भुदरगड तालुक्य...