दै. विश्वरूप'चे चैतन्य !
माझ्या पत्रकारितेचे गुरु म्हणून मी ज्यांचा उल्लेख करत आहे ते दै. विश्वरूप या रायगड जिल्ह्याच्या वृत्तपत्राचे संपादक श्री. सतीश धारप ! तुम्ही वेगवेगळ्या विचारसरणी असणारे,दिग्गज,ज्ञानी संपादक पाहिले असतील पण प्रतिथयश दैनिकाचा आंधळा संपादक बहुदा पाहिला नसेल ! डायबिटीजमुळे किडन्या आणि डोळे गमावलेले धारप साहेब आठवड्यातून दोन वेळा डायलिसीस घेतात.कुटुंबप्रमुख म्हणून आजही या अवस्थेत ते कुणावर विसंबून न राहता स्वतः पत्रकारितेच्या माध्यमातून पैसे मिळवतात आणि स्वतः आनंदात राहत इतरांनाही आनंद देतात. रायगड जिल्ह्यातील सर्वसामान्य माणसांपासून तीर्थरूप डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी परीवारापर्यंत त्यांना आदराचे स्थान आहे. त्यांची सकाळ पहाटे ४ वाजता होते आणि बरोबर ६ वाजता रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री, आमदार, खासदार तसेच प्रशासकीय सेवेतील महत्वाच्या व्यक्ती यांना 'नेते नमस्कार' म्हणून त्यांचा फोन जातो. केवळ एकदाच एखादा फोन नंबर त्यांना सांगितला कि तो त्यांना पाठ झालाच म्हणून समजा मग तो नंबर त्यांना एक वर्षानंतर विचारा… मी त्यांच्यासोबत रायगड,...