झुलपेवाडी आणि साने गुरुजी वाचनालय
ज्ञान,मनोरंजन आणि विकास हि आवश्यक त्रिसूत्री अजेंड्यावर ठेवत कोल्हापूर जिल्ह्यातील, आजरा तालुक्यातील झुलपेवाडी या गावच्या साने गुरुजी वाचनालयाची रौप्य महोत्सवी वाटचाल सुरु आहे.आज या गावाची ओळख सांगताना दिल्ली वारी करून आलेले येथील भजनी मंडळ व तरुण भारत लेझीम पथक यांची जागा समर्थपणे साने गुरुजी वाचनालयाने घेतली आहे असेच म्हणावे लागेल. भुदरगड या घाट प्रांताला व कोकणाशी जोडणाऱ्या ऐतिहासिक पायवाटेवरील हे गाव. येथील चिकोत्रा नदीमध्ये पांडवांचे पाय लागून डोह तयार झाल्याच्या कथा आम्हाला लहानपणी सांगितल्या जायच्या. आज येथे चिकोत्रा मध्यम प्रकल्प हे धरण व धरणावरील गणेश मंदिर आणि वीजप्रकल्प पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. गावच्या वरच्या बाजूस बेगवडे गावामध्ये पांडवांनीच एका रात्रीत बांधलेले देऊळ पाहायला मिळेल. पानझडी वृक्षामुळे आजरा तालुका असला तरी भुदरगड आणि गडहिंग्लज तालुक्याशीच जवळीक साधणारे हे गाव आहे. पूर्वी चंदगड हा विधानसभा मतदार संघ होता आज त्याचा संबंध कागल मतदार संघाशी जोडला गेला आहे. पारंपारिक शेतीची जागा आता बागायती शेतीने घेतली असून ऊस,भात,गहू,भुईमुग,ज्वारी ई. पि...