मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळणेबाबत विनंती पत्र !
प्रति मा. अध्यक्ष साहित्य अकादमी, नवी दिल्ली विषय-मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळणेबाबत विनंती पत्र ! मा. महोदय सप्रेम नमस्कार !लोकाभिमुख शासन आणि गतिमान प्रशासनाकडून नागरिकांच्या खूप अपेक्षा आहेत.सामाजिक भावनिक प्रश्न जिव्हाळ्याचा आणि अस्मितेचा असल्याने मराठी आय पाकृतअतिप्राचीन भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा या भावनेने हा पत्रप्रपंच करत आहे. महाराष्ट्राच्या अस्मिता म्हणजे महाराष्ट्राचा दैदिप्यमान संघर्षाचा इतिहास आणि महाराष्ट्राची मातृभाषा मराठी ! भाषावार प्रांतरचना करत असताना मराठी भाषेच्या व मराठी भाषिकांच्या हौतात्म्यातून महाराष्ट्राची निर्मिती झाली असल्याचे सर्वश्रुत आहे. हिंदू धर्माचे परकीयांपासून संरक्षण करत असताना सहिष्णुतेची भागवत बीजे याच महाराष्ट्रात रुजली आणि देशाला मार्गदर्शक बनली. प्रसंगी नाठाळाचे माथी काठी हाणण्याचे सामर्थ्य याच महाराष्ट्र धर्मातून निर्माण झाल्याने स्वराज्य आणि सुराज्याची कल्पना सत्यात उतरविणारे जहाल आणि मावळ वीरसुद्धा याच भाषेचे बाळकडू घेवून सिद्धत्वास पावले. पुरोगामित्व प्रयोगातून सिद्ध करणारा महाराष्ट्र मागून गोष्ठ मिळवत नाही हा स्व...