ध्वजोत्सव !
ध्वजोत्सव ! लिया हाथमे ध्वज कभी ना झुकेगा । कदम बढ रहा है कभी ना रुकेगा । विजय रणांगणातील असो वा अन्य क्षेत्रातील; ध्वज हा पाहिजेच ! विजयाचे व विजयाकांक्षेचे प्रतिक असलेले ध्वज संघर्षमय मानवी जीवनात मान्यता पावलेले आहेत. विजयी, स्वतंत्र व ऐश्वर्यसंपन्न राष्ट्रांना त्यांचा ध्वज वैभवशाली जीवनांचे रक्षण करण्यास व विकसनशील राष्ट्रांना ध्वज मागील पिढ्यांच्या रोमहर्षक पराक्रमांची व अतुलनीय स्वार्थत्यागाची आठवण करून देत असतो. अनेक राष्ट्रांच्या ध्वजाचा इतिहास रोमहर्षक आहे. ऑसट्रेलीयाच्या ध्वजाचा उदय युद्धातच झाला आहे. पुरातन ध्वज हे बहुतेक शुद्ध धार्मिकच होते असे अमेरिकेच्या ज्ञानकोशात निसंधीग्ध शब्दात सांगितले आहे. युद्धक्षेत्रात उतरण्यापूर्वी परमेश्वरी दैवी शक्तीचा वरदहस्त घेण्याकडे मनुष्याचा स्वाभाविक ओढा असतो. अर्जुनाने आपल्या रथावरील मारुतीचे चिन्ह ध्यान करून आणून लावले असे वर्णन आढळते. इंग्लंडच्या पहिल्या एडवर्ड राजाने तर सेंट जॉनचे चित्र असलेला मंदिरावरील ध्वज एका मोहिमेत सैन्यासोबत आदरपूर्वक न्हेला होता. आणि त...