आधुनिक म्हणी! १. साधुसंत येती घरा, दारंखिडक्या बंद करा २. ज्याची खावी पोळी, त्यालाच घालावी गोळी ३. एकमेका पुरवू कॉपी, अवघे होऊ उत्तीर्ण ४. लांबून देखणी, जवळ आल्यावर चकणी ५. चोर्या करुन थकला आणि शेवटी आमदार झाला ६. आपले पक्षांतर, दुसर्याचा फुटीरपणा ७. प्रयत्ने लाईनीत उभे राहता रॉकेलही मिळे ८. अन्यायाचा फास बरा, पण चौकशीचा त्रास आवरा ९. जया अंगी खोटेपण, तया मिळे मोठेपण १०. एल.एल.बी झालो अन भिकेला लागलो ११. सरकार जेवू घालीना, पदवी भिक मागू देईना १२. वशिल्याच्या नोकरीला इंटरव्ह्यु कशाला १३. वयही गेले, पैसेही गेले, हाती राहीले दाखले १४. घोड्याच्या शर्यतीत वशिल्याचे गाढव पुढे १५. साहेबापुढे वाचली गीता, कालचा मेमो बरा होता १६. गाढवापुढे वाचली गीता वाचणारा गाढव होता १७. स्मगलींगचे खाणार, त्याला दाऊद देणार १८. मी हसते लोका, शेंबूड माझ्या नाका १९. न्हाव्यावर रुसला अन जंगल वाढवून बसला २०. पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा २१. पुढार्याचं मुळ व हॉटेलची चूल पाहु नये २२. नाव सुलोचनाबाई, चष्म्याशिवाय दिसत नाही २३. नाव गंगूबाई, आंघोळीला...