
Posts
Showing posts from 2014
स्वामी गर्जनेची काल आठवण झाली !
- Get link
- X
- Other Apps

चक्र आता फिरून येत आहे. भारतातून पुन्हा एकदा शक्तीचा प्रवाह वाहत आहे. पृथ्वीच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्यास त्याला वेळ लागणार नाही. विश्वास ठेवा, प्रभूचे फर्मान निघाले आहे कि भारताची उन्नती होईलच होईल ! सर्वसामान्य जनता आणि गरीब लोक सुखी होतीलच होतील ! भारत पुन्हा उजळेल यात संदेहच नाही. पण जडाच्या शक्तीने न्हवे तर चैतन्याच्या शक्तीने; विनाशाचा झेंडा नाचवून न्हवे तर शांती आणि प्रेमाची विजयी पताका फडकवून. आपल्या कार्यावरच भारताचा भविष्यकाळ अवलंबून आहे. आपली हि भारतमाता हळूहळू नेत्र उघडत आहे. ती कांही काळ निद्रिस्त झाली होती इतकेच… म्हणून भारताचे उज्वल भविष्य करण्याचे रहस्य संघटना,शक्तीसंचय आणि इच्छाशक्तीच्या परस्पर सहकार्य यातच साठलेले आहे.आपल्या सगळ्यांनाच आता कठोर परिश्रम करावे लागणार आहे. खूपखूप झटावे लागेल. उठा ! लांबच लांब रात्र संपून अरुणोदयाचा समय आला आहे. आता एक विशाल लाट उठली आहे तिचा वेग कोणीही रोखू शकणार नाही ! या गोंधळातून आणि झगड्यातून वैभवसंपन्न,अजिंक्य,परिपूर्ण असा उद्याचा भारत मला माझ्या मनचक्षुपुढे दिसतो आहे ! स्वामी विवेकानंद ! वन्दे मातरम ...
SUPORT TO SURAJ !
- Get link
- X
- Other Apps
सुरज जाधव आगे बढो ! आमचे परममित्र झुलपेवाडीचे सुपुत्र सुरज जाधव यांनी कोल्हापूरच्या लढाऊ बाण्याचे उदाहरण दाखवून दिले असुन चिकोत्रेचे पाणी मुंबई भायखळा येथील शाबु सिद्धिकी महाविद्यालयाच्या प्रशासनाला दाखवून दिले आहे. ईंटेरिअर डिझायनर ला प्रवेश घेतलेल्या ६० विध्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या प्रथम दिवशी शासन निर्णय दाखवून सदर कोर्स बंद झाल्याने आपली प्रवेश फी घेवून जा असे सांगण्यात येत होते. अश्यावेळी उशीर झाल्याने आपल्याला इतर ठिकाणी प्रवेश मिळणार नाही त्यामुळे वर्ष वाया जाणार म्हणून विध्यार्थ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. पण सुरज जाधव एकटाच या विरोधात उभा असून इतर विध्यार्थाची जमवाजमव करत आहे. लोकशाहीमध्ये शिक्षण म्हणजे व्यापार नसून संस्कार आहे याचा विसर शिक्षणसम्राटांना व व्यवस्थापनाला पडला असेल तर विध्यार्थी कर्तव्याने त्याची जाणीव करून देण्याच्यासुरजच्या लढ्याला प्रतिसाद म्हणून मी स्थानिक सर्वपक्षीय युवा आणि विध्यार्थी संघटनेची मदत मागितली पण विधानसभेच्या समोर कांही प्रतिसाद मिळत नसल्याने शाबु सिद्धिकी चे ट्रस्टी असलेल्या मुश्ताक अंतुले (माजी मुख्यमंत्री ए आर अंतुले यांचे च...
आधुनिक म्हणी!
- Get link
- X
- Other Apps
आधुनिक म्हणी! १. साधुसंत येती घरा, दारंखिडक्या बंद करा २. ज्याची खावी पोळी, त्यालाच घालावी गोळी ३. एकमेका पुरवू कॉपी, अवघे होऊ उत्तीर्ण ४. लांबून देखणी, जवळ आल्यावर चकणी ५. चोर्या करुन थकला आणि शेवटी आमदार झाला ६. आपले पक्षांतर, दुसर्याचा फुटीरपणा ७. प्रयत्ने लाईनीत उभे राहता रॉकेलही मिळे ८. अन्यायाचा फास बरा, पण चौकशीचा त्रास आवरा ९. जया अंगी खोटेपण, तया मिळे मोठेपण १०. एल.एल.बी झालो अन भिकेला लागलो ११. सरकार जेवू घालीना, पदवी भिक मागू देईना १२. वशिल्याच्या नोकरीला इंटरव्ह्यु कशाला १३. वयही गेले, पैसेही गेले, हाती राहीले दाखले १४. घोड्याच्या शर्यतीत वशिल्याचे गाढव पुढे १५. साहेबापुढे वाचली गीता, कालचा मेमो बरा होता १६. गाढवापुढे वाचली गीता वाचणारा गाढव होता १७. स्मगलींगचे खाणार, त्याला दाऊद देणार १८. मी हसते लोका, शेंबूड माझ्या नाका १९. न्हाव्यावर रुसला अन जंगल वाढवून बसला २०. पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा २१. पुढार्याचं मुळ व हॉटेलची चूल पाहु नये २२. नाव सुलोचनाबाई, चष्म्याशिवाय दिसत नाही २३. नाव गंगूबाई, आंघोळीला...
महाराष्ट्र दिन : संयुक्त महाराष्ट्राचा लढा
- Get link
- X
- Other Apps
महाराष्ट्र दिन : संयुक्त महाराष्ट्राचा लढा इ.स.१९५६ च्या नोव्हेंबरातील २१ तारखेची ती संध्याकाळ होती. सकाळपासून फ्लोरा फाउंटनच्या परिसरात तणावाचे वातावरण होते. राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले होते. मराठी बाण्याची मुंबई या अन्यायाने खवळून उठली होती. सर्वत्र छोट्यामोठ्या सभांमधून त्याचा जळजळीत निषेध होत होता. याचा संघटित परिणाम म्हणून कामगार आणि पांढरपेशांचा एक विशाल मोर्चा, तेव्हाच्या विवेकशून्य सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाऊंटनासमोरील चौकात येणार होता. दुपार टळल्यानंतर, म्हणजे मुंबईतल्या शंभर-सव्वाशे कापडगिरण्यांमधील, कामगारांची चारची पहिली पाळी संपल्यानंतर गिरणगावातून मोर्चा निघेल, असा अंदाज होता. पण त्याला छेद देत पांढरपेशांचा प्रचंड जनसमुदाय,एका बाजूने चर्चगेट स्थानकाकडून व दुसऱ्या बाजूने बोरीबंदरकडून गगनभेदी घोषणा देत,फ्लोरा फाउंटनकडे जमू लागला. हा मोर्चा पोलिसी ताकद वापरून उधळला जाईल, असा अंदाज होताच. कारण फोर्ट भागात जमाव आणि सभाबंदी जारी केली होती. सर्व कार्यालयांतील महिला कर्मचाऱ्यांना घरी पाठविले होते. जमावबंदीचा भंग क...
हे कसले गुप्त मतदान ?
- Get link
- X
- Other Apps
बिनविरोध निवडणूक म्हणजे लोकशाहीचा खून ! निवडणूक आयोग बक्षिसाचे गाजर दाखवून बिनविरोध निवडणुकीचा पर्याय ठेवते हा लोकशाहीचा अपमान आहे. मतदारांना गृहीत धरण्याचे आणि नेहमीच्याच गावपुढाऱ्यांना विनाखर्च सत्ता देण्याचा हा डाव आहे. प्रत्येक गावात जातीयवादी/भावकी,गावकी असे विविध गट कार्यरत असतात. त्यागटातील प्रभावी नेत्यांची हुकूमशाहीच लोकशाहीच्या पदरा आडून सुरु असते. पाच वर्षातून एकदा आलेली निवडणूक तथाकथित लोकप्रतिनिधींना आत्मपरीक्षण करायला लावणारी असते. मतदानाचा हक्क बजावून नागरिक आपला कल देतात. मात्र बिनविरोध निवडणुकीचे फॅड आणून हा हक्कच हिरावून घेतला जातो. सर्वच मतदारांनी निवडणुकीत उभे राहण्याची गरज नाही !निवडणुका भावाभावात भांडणे लावते हा सुद्धा बिनबुडाचा आरोप असून सुसंस्कृत समाजाला मूर्ख ठरवणारा हा समज आहे. मतदार दबाव गट तयार करून सत्तेची स्वप्ने बघत नाही तर तो उमेदवार पाहून मत देऊ शकतो नई हेच लोकशाहीप्रधान यंत्रणेत अभिप्रेत आहे. निवडणूक खर्च म्हणून बॅनरबाजी,जाहिरातबाजी,मतदारांना विविध आमिषे देऊन खर्च होतोय असा गोंगाट घालणे चुकीचे आहे. डिपॉसिट अत्यल्पच असते आणि निवडणूक आ...
पारदर्शकता हरवतेय….
- Get link
- X
- Other Apps
सगळे चोर आहेत. कुठे जायचय याचा धोरणात्मक विचार कुणालाही नाही.पैसा हे अंतिम ध्येय बनत आहे.तत्वज्ञानापेक्षा व्यवहारवाद श्रेष्ठ ठरतोय हे दुर्दैव आहे.त्यामुळे सर्वच क्षेत्रात बजबजपुरी माजली आहे. सर्वकांही अगदी ठरवून ठेवल्यासारखे आहे मात्र विश्वासार्हता पणाला लागलेली दिसते.काळ हाच कांही गोष्टींवर उत्तर देत असतो या आशेवर कुणाला पटो न पटो, आवडो न आवडो आपण मात्र खरे आणि स्पष्ट बोलायचे !